रूपनारायण
आज रविवार सुट्टीचा दिवस! एकदोन निमंत्रणं होती. पण गेलो नाही. कालच ठरवलं होतं रूपनारायण मंदिर बघून यायचं. कोल्हापुरात इतके दिवस झाले राहतोय, पण हे मंदिर पाहिलं नव्हतं.
सकाळी साडेसातला गूगल मॅपवर डेस्टीनेशन टाकलं आणि निघालो चालत. साडेपाच किमी अंतर दाखवत होतं. तरीही चालतचं राहिलो कारण मनाला ओढ लागली होती, दर्शनाची!
सलग एक तास चालल्यावर गूगलच्या बाईनं सांगितलं "तुम्ही पोचलाय, थांबा आता!" काळ्याकुट्ट दगडांमध्ये बांधलेल्या या मंदिराने इतिहासाची कित्येक पाने हृदयात सांभाळून ठेवली असतील! अंबाबाई मंदिरापासून जवळच असलेलं हे मंदिर तस्सच हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आणि तेवढच जुनं आहे.
मला वाटलं होतं, मंदिर सुसज्ज असेल. पण तसं काही नाही. गंगावेशीतल्या उंचउंच इमारतींच्या आडोशाला याचं अस्तित्व थोडं झाकलं गेलंय. मंदिरासमोर एकीकडे जुन्या मुर्त्या दगडांच्या ढिगाऱ्यात पडल्यात तर दुसरीकडे अतिजीर्ण झालेलं एक घर आहे. एका कोपऱ्यात लोखंडी जाळीमध्ये दोन शिलालेख ठेवले आहेत, हे लेख प्राचीन कन्नड लिपीत आहेत. त्याचा मराठी अर्थ तिथेच डिजिटल बोर्डवर लिहला आहे.
मंदिरात आत जाण्या अगोदर हे सर्व पाहिलं. इतिहास जाणून घेतला. त्या शिलालेखात लिहलंय, "हे मंदिर पद्मावतीवरदहस्तप्राप्त शिलाहार महासामंत निम्बदेवराय याने एक हजार वर्षांपूर्वी बांधलं, शिलाहार महाक्षत्रिय श्रीमद गंडरादित्य याचा पुत्र (रुपनारायण) विजयादित्याने महादान दिल्यामुळे या मंदिरास 'रुपनारायण मंदिर' असे नाव प्राप्त झाले.
पुढे दुसऱ्या शिलालेखात मंदिराच्या व्यवस्थेसाठी कोल्हापुरातील व्यापारावर असलेले कर लिहले आहेत.
हे वाचत असताना उर भरून आला कारण मी आमचा गौरवशाली इतिहास वाचत होतो. पण एका क्षणानंतर थोडं वाईट वाटलं, कारण हा इतिहास आम्ही दुर्लक्षित ठेवलाय.
आता डोळे गच्च भरले होते, असाच आत गेलो. जीर्णोद्धाराचं काम सुरु आहे. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती बाहेर ठेवली होती. अन्य काही मुर्त्यादेखील तिथे होत्या. इथली प्रत्येक मूर्ती खूप सुरेख आहे, मनाला वाटतं की समोर प्रत्यक्ष देव बसला आहे.
अजूनही इथेच बसलोय, पाय निघेना इथून माझा! बाहेरच्या भिंतीवरची धूळ मी झाडून काढली. भिंतीच्या त्या काळ्या दगडांना माझा हात लागताच ती दगडं बोलू लागली, माझ्या पूर्वजांचा उज्ज्वल इतिहास सांगितला त्यांनी.
कधी आलात कोल्हापूरला तर नक्की बघा इथलं दुर्लक्षित सौंदर्य.
@सुरज मडके

No comments:
Post a Comment