काही मुलाखती खूप गाजतात, कारण ती माणसंही गाजलेली असतात. म्हणूनच सहसा सामान्य माणसाची मुलाखत कुणी घेत नाही. कारण त्याची गाजत नाही.
कृष्णा-वारणा-पंचगंगेच्या खोऱ्यातल्या एका कलंदर माणसाची अशीच एक न गाजलेली मुलाखत..
त्याला विचारलेली प्रश्नं इथे दिली नाहीत, पण त्याच्या उत्तरांवरून प्रश्नाचा अंदाज नक्कीच येईल.
आमचं बाकी मजेत हाय..
उन्हाळा जरा जास्त हाय,
उकाडा पण वाढलाय,
पण आमचं बाकी मजेत हाय..
पाऊस जरा कमी हुता,
नदीचा काठ उघडा पडलाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
गावची जत्रा जवळ आल्या,
जत्रत लई फिरायचं हाय,
रानात कणसाचा पत्ता नाय,
निवद मात्र दाकवायचा हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
एकदोन माणसं मोठी झाली,
हाती पैसापाणी बक्कळ हाय,
त्यांचा शानपणाचा मक्ता हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
कायबी हुदे, खायला दोन घास,
आण प्याला पाणी हाय,
कारण कृष्णा-वारणाईची कृपा हाय,
म्हणूनच आमचं बाकी मजेत हाय..
कृष्णा-वारणा-पंचगंगेच्या खोऱ्यातल्या एका कलंदर माणसाची अशीच एक न गाजलेली मुलाखत..
त्याला विचारलेली प्रश्नं इथे दिली नाहीत, पण त्याच्या उत्तरांवरून प्रश्नाचा अंदाज नक्कीच येईल.
आमचं बाकी मजेत हाय..
उन्हाळा जरा जास्त हाय,
उकाडा पण वाढलाय,
पण आमचं बाकी मजेत हाय..
पाऊस जरा कमी हुता,
नदीचा काठ उघडा पडलाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
गावची जत्रा जवळ आल्या,
जत्रत लई फिरायचं हाय,
रानात कणसाचा पत्ता नाय,
निवद मात्र दाकवायचा हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
एकदोन माणसं मोठी झाली,
हाती पैसापाणी बक्कळ हाय,
त्यांचा शानपणाचा मक्ता हाय,
तरीबी आमचं बाकी मजेत हाय..
कायबी हुदे, खायला दोन घास,
आण प्याला पाणी हाय,
कारण कृष्णा-वारणाईची कृपा हाय,
म्हणूनच आमचं बाकी मजेत हाय..
No comments:
Post a Comment