तिच्याबद्दल थोडेसे....

आज ती मला दिसली, माझ्याकडे बघून गालात हसली.  तसं आम्ही वरचेवर भेटत नाही. अन् भेटलो तर कधी बोलत नाही. दोन वर्षांपूर्वी एका फाईलच्या निमित्तानं भेटल्यावर एकदाच बोललो होतो. पण प्रत्येकवेळी भेटल्यावर आम्ही बोलत जरी नसलो तरी स्माईल नक्की देत होतो. पण आज तिचा इरादा काहीसा वेगळा वाटत होता.
ती सरळ माझ्यासमोर आली, आणि म्हणाली "मला काहीतरी सांगायचं आहे." मी म्हणालो "सांग ना, तु काहीही बोल, ऐकतो मी."
"नाही इथे नको, जाऊ कुठेतरी" ती म्हणाली.
मी आश्चर्याने "म्हणजे!"
‌त्यावर ती पुन्हा हसत म्हणाली, (आमच्या गावाकडच्या स्टाईल मध्ये) "अरे तुला काय मारत नाही मी, 'च्या' (चहा) प्यावसं वाटालयं, चल."
"बर बाई चल." मी आनंदान म्हणालो.
जाताजाता मला भूतकाळ आठवत होता, आमची पहिली भेट, ते जुने दिवस, मी तिला पाहीलेले, तिने मला पाहीलेले. कित्येक वर्षे झाली, आमची फक्त नजरानजर व्हायची, अन् मी नजर चोरून घ्यायचो. प्रत्येकवेळी असंच व्हायचं. माघार मीच घ्यायचो. पण आज चक्क तिनंच मला चहाला बोलवावं, घोर आश्चर्य!
डोक्यात हे विचारचक्र फिरत होतं, मात्र तोंड शांत होतं.
एकदोन मिनिटं चालल्यावर आम्ही कॅन्टीनला पोचलो. तिनंच दोन चहाची ऑर्डर दिली.
ती बोलण्याचा पवित्रा घेत म्हणाली "अरे",
पुढचं काहीच न बोलता ती थांबली.
आतातर त्या गजबजलेल्या कॅन्टीनमध्येही मला भयाण शांतता वाटत होती.
मी काहीच न बोलल्याचं पाहून तिनंच पुढाकार घेतला होता.
तोवर चहा आला. भरउन्हात पुरा गारठलो होतो मी. पटकन चहा तोंडाला लावून एक घोट घेतला. ओठाला चटका लागला होता. पण सांगतोय कुणाला? पण तिनं ते अचूक हेरलं, म्हणाली "हळू! काय गडबड हाय?" मी नुसती नकारार्थी मान डोलावली. मी गप्प बसलेलं पाहून ती अधिकारवाणीनं म्हणाली "तू बोलणार आहेस की नाही?"
मी काय बोलणार तिनं आज फक्त बोलत रहावं आणि मी ते ऐकत रहावं, असं मला वाटत होतं. तिचा कोमल आवाज मला खूप आवडायचा. पण त्या वेडीला ते कोण सांगणार?
तिनं मला विचारलं "तुला काय आवडतंय?"
माझा कावराबावरा चेहरा बघून म्हणाली "म्हणजे तुझी फेवरेट डिश सांग."
मी हळूच म्हणालो "पुरणपोळी".
"बापरे, मला काय ते येत नाही हं करायला." ती पटकन बोलून गेली पण चुकून बोलल्यासारखं दाताखाली जीभ चावली.
मला आणखीनच हुडहुडी भरली, "क क क क काय?" मला बोलताच येईना.
आता तीपण थोडी घाबरली होती, तिच्या एका वाक्यात खुपकाही अर्थ दडला होता.
तरीही ती म्हणाली "सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात काय? काही समजून घ्यायच्या असतात." माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी स्वतःला सावरलं. कारण मला माहीत आहे, लाडात वाढलेली लेक ती! तिला या फसव्या जगाची रित माहीत नाही.
मला काहीही न समजल्यासारखा खोटाखोटा निरागस भाव आणता आला असता. पण मी थोडा समंजसपणा दाखवत, धीरानं म्हणालो "अगं पण, ...."  तिनं मला थांबवलं, आणि म्हणाली "तू फक्त हो की नाही ते सांग."
मी: अगं पण माझी परिस्थिती....?
ती: काय वाईट आहे, तुझी परिस्थिती? सगळंच तर आहे तुझ्याकडे. काय कमी आहे तुझ्यात?
मी: तरी पण....
ती: हे बघ! मी खूप साधी मुलगी आहे. साधं जगणं येतंय मला.
मी: अगं तुला कोणीही भेटेल, तुला सुखात ठेवणारा.
ती: म्हणजे तू मला सुखात ठेवू शकत नाहीस?
मी: अगं तसं नाही!
ती: मग कसं?
मी: तुला सांगून पटणार नाही!
ती: खरं सांग, मी तुला इतर मुलींप्रमाणेच वाटते ना?
मी: तसं नाही गं!
तिचा पारा आता खुपंच चढला होता. रागरागत ती म्हणाली "सरळ सांग, तुझा माझ्यावर भरोसा नाही ना?"
मी काहीच बोलायच्या आत ती उठून निघून गेली.
पण माझ्या सोनूनं त्या भरोश्याच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला पाहिजे होतं. परिस्थितीत अडकलेल्या आणि काळाच्या बंधनात सापडलेल्या तिच्या सोन्याचं मन तिनं जाणायला हवं होतं.
असो! ती उठून गेली, पण मी अजून तिथेच होतो, तिचाच विचार करत.
क्षणभर वाटलं की हे स्वप्नतर नाही ना? पण माझ्यासमोर चहाचे ते दोन ओले कप व तिचा नाव लिहलेला रुमाल अजून तसेच होते.
इतक्यात आईने जोरात हाक मारली आणि मी डोळे उघडले.

1 comment:

  1. How to Make Money from Playtech Playtech Betting on a
    Best-In-Play Playtech Betting Sites. 1. DraftKings, BetMGM, GVC Holdings, Paddy Power, Betway, Betway, Unibet, Unibet, etc. BetMGM งานออนไลน์

    ReplyDelete

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...