आज बारामतीत आलोय, दुपारी कॉलेजमध्ये गेलो होतो; सगळीकडे शुकशुकाट दिसला, डिपार्टमेंट बंद होतं. ओळखीचं कुणीतरी भेटेल असं वाटलं पण तस काही झालं नाही. टीसी साठी आलोय; म्हटलं गडबडीनं काम उरकू, ३.००-४ वाजले असतील. घाईघाईत प्रशासन भवनात गेलो. जाताजाता प्राचार्यांच्या केबिनमध्ये वाकून बघितलं; प्राचार्य तर नव्हते, पण थोडा काळोख दिसला. पण त्याच केबिनमध्ये एका मंद दिव्याने फोकस केलेल्या गोमटेश्वराच्या फोटोतील स्मितहास्य पाहून थोडा कंटाळा गेल्यासारखं वाटलं अन मन प्रसन्न झालं. का कुणास ठाऊक पण माझ्या कामासाठी पूर्ण दिवस जातो की काय, अस वाटत असतानाही ५०% काम एका तासात झालं. ऑफिस- ग्रंथालय इथे तर १० मिनिटात कामं झाली. उरलेलं काम उद्याच्या उद्या व्हावं हीच इच्छा. पण एवढं सगळं होताना माझे कावरे बावरे डोळे कोकरे सरांना शोधत होते, पण ते काय दिसले नाहीत.
५ वाजता म्हटलं जरा फिरावं, थोडसं फिरलो. काही गोष्टी observe केल्या.
कॉलेज खूप सुधारलंय, गेट खूपच छान बांधलय (तसं आधीचही काही वाईट नव्हतं), जीवराजच्या शेजारी बांधकामाचा बेत दिसतोय, ऑफिसची लोक तेवढ्याच तत्परतेनं काम करत होती, ग्रंथलयातल्या दोन्ही मॅडम तिथेच आणि तश्याच दिसल्या. बाहेर आल्यावर त्यावेळच्या मोकळ्या जागी उंचउंच इमारती दिसल्या, दुथडी भरून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये आज जरा पाणी कमीच होतं. पलीकडच्या उतारावरचा तो wrong turn नवीन भिंत बांधून right केलाय. कधीकाळी चिटपाखरू नसलेल्या तारा थेटर जवळ आज मोठमोठे बॅनर्स लागलेत. पुढच्या कोपऱ्यातील कचरा कुठे गायब झाला कुणास ठाऊक? दुर्गा टाकी आजपण त्याच दिमाखात दिसली. त्याचं कोपऱ्यावर गाड्यावर फळं विकणारी मावशी आजपण शून्यात पाहत होती. दुगडच्या दुकानात आजपण गर्दी होती. मॉल काढायची स्वप्नं बगणाऱ्या चिंचकरनं किराणा सोडून रिचार्जचं दुकान टाकलंय. चंदुकाकाच्या दुकानात खूपच गर्दी होती, पण पलीकडच्या स्पेअरपार्टच्या दुकानात आजपण कोण नव्हतं. मात्र बाजारपेठ खूपच फुलली होती; पूर्वीसारखीच!
माझ्या रूममध्ये काही नवे चेहरे दिसले, तिथल्या जोतिबा मंदिरात आजही जिवंत झऱ्याचं पाणी तेवढंच थंड लागलं. रूममध्ये थोडेजन भेटले उरलेले नंतर भेटतील, पण मला अण्णा म्हणून हाक मारणारे बापू भेटले नाहीत; खूप दूर निघून गेलेत ते, कधीच न भेटण्यासाठी.....